Sanjay Gaikwad : मी भरलेला अर्ज अजून कायम आहे

Sanjay Gaikwad : मी भरलेला अर्ज अजून कायम आहे

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड म्हणाले की, मी भरलेला अर्ज अजून कायम आहे. अर्ज आहे. अर्ज लढण्यासाठी असतो. मला अनेकांनी विचारलं तुम्ही गुपचूप अर्ज भरला. हे ही खरं आहे की, मी अर्ज भरताना मी 5 लोकांच्या साक्षीने तो भरला. अनेकांनी हे पण विचारले की, सगळे लोक तयारी करतात तुमची काही तयारी नाही.

आता जे लोकं तयारी करतात ते लोक निवडणुकांमध्ये एक महिना दोन महिन्यांआधी एन्ट्री मारतात. मला आज 39 वर्ष झालीत. 39 वर्षांपासून मी लोकांची काम करतो आहे. धडपड करतोय. त्यामुळे मला कुठल्या तयारीची गरज पडत नाही. मी मनात वाटलं तेव्हा सर्व चक्र फिरवू शकतो. माझा अर्ज कायम आहे. असे संजय गायकवाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com