Sanjay Kenekar On Udhhav Thackeray : "उद्धव ठाकरे दगाबाज तर..." उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन केणेकर संतापले
उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच नेतृत्व वडिलांना दगा देणारे आहे, असे म्हणत ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपा नेते आमदार संजय केणेकर यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दगाबाज तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिगरबाज नेतृत्व असे म्हणत, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना जनतेसाठी काय केले? याचा मराठवाड्याचे लोक हिशोब विचारणार असा इशारा देखील त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी सोनिया गांधी यांचे पाय चाटले तर उपमुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्या मांडीवर बसल्याच संजय केणेकर यांनी विधान केलं आहे. यावेळी संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना बांधावर मोफत खते आणि बियाणे देऊ म्हणत शेतकऱ्यांना फसवले आणि शेतकऱ्यांसोबत दगा केला. एवढचं नाही तर कोरोना काळात घरात बसून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद चालवले आणि मुडद्याच्या टाळूवरचे लोणी खान्याचे पाप करत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करत जनतेला दगा दिला. असे अनेक गंभीर आरोप भाजप आमदार संजय केणेकर यांनी केले आहेत.
