कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातील चिमगाव या आपल्या गावी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संजय मंडलिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संजय मंडलिक म्हणाले की, उन्हाळ्याचे दिवस असूनसुद्धा प्रचंड संख्येने सकाळी लोकांनी मतदान केलं आहे. यावेळी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना कोल्हापूरचा प्रतिनिधी त्यांच्यासोबत पाठवणे या भावनेनं मतदान होत आहे. असे संजय मंडलिक म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com