पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा; संजय मंडलिक म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा; संजय मंडलिक म्हणाले...

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कोल्हापुरच्या तपोवन मैदानावर पार पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कोल्हापुरच्या तपोवन मैदानावर पार पडत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. संजय मंडलिक म्हणाले की, मोदीजींच्या सभेचा केवळ हातकणंगले, सातारा, सांगली येवढाच परिणाम होणार नाही तर पलिकडच्या कर्नाटकामध्येसुद्धा उपयोग होणार आहे.

मोदीजींची एका ठिकाणी सभा झाली तर त्याचे वातावरण फार लांबपर्यंत पसरते याचा अनुभव देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण बघितले आहे. या निवडणुकीमध्येसुद्धा याचा कर्नाटकसह अगदी कोकणासह फायदा होणार आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, ही निवडणूक दिल्लीची आहे. ही निवडणूक गल्लीची करण्याचा काही विरोधकांचा प्रयत्न आहे. ज्यावेळी दिल्लीच्या निवडणूका आहेत किमान त्याचे भान विरोधकांनी राखायला पाहिजे. मोदीजींची एक सभा लाखोंचा फरक पाडू शकते हे आपण बघितले आहे. माझं मताधिक्य चांगलं होतं आता अधिक ताकदीने मताधिक्य वाढेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com