Sanjay Raut And Amol Kolhe
Sanjay Raut And Amol Kolhe

लोकसभेच्या मतमोजणी दरम्यान खासदार संजय राऊत आणि डॉ. अमोल कोल्हेंनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभेच्या मतमोजणी दरम्यान खासदार संजय राऊत आणि डॉ. अमोल कोल्हेंनी माध्यमांशी संवाद साधून महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
Published by :

Loksabha Election 2024 Result : मतदान होण्याआधी प्रचाराला गेलो होतो. अनेकांनी विचारलं होतं की, एव्हढा आत्मविश्वास कसा आहे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि शिरुर लोकसभेच्याए मायबाप मतदारांचा हा आत्मविश्वास आहे. तेच चित्र आज पाहायला मिळत आहे, याचं आज समाधान आहे. संघर्ष जेव्हढा मोठा होतो, विजय तितकाच शानदार असतो. इतक्या मोठ्या नेत्यांना आव्हान दिल्यावर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. शरद पवार साहेब हे आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. सर्वसामान्य कार्यकर्त्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासाप्रती जिगरीनं लढवलेली ही निवडणूक आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

काँग्रेसने १५० जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला. महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील. देशभरात इंडिया आघाडी २९५ जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल. कोणत्याही परिस्थितीत एनडीएला बहुमत मिळणार नाही, असं मला वाटतं. पूर्ण निकाल आल्यानंतर सर्वकाही समोर येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com