Sanjay Raut : एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा? संजय राऊत काय म्हणाले पाहा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, शहा यांनी एकनाथ शिंदे यांची मागणी फेटाळून लावली असल्याच ते म्हणाले आहेत. राऊत यांच्या दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, शहा यांनी एकनाथ शिंदे यांची मागणी फेटाळून लावली आहे. हेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केलीये. सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिली नसल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदेंची शिवसेना भाजपामध्ये विलीन करण्याचा प्रस्थाव अमित शहा दिला आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील स्वच्छतेचं कंत्राट रद्द करण्यात आली यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाले. आरोग्यमंत्री कोण होते त्यांचे घोटाळे समोर आले आहेत. भाजपचा त्यांना विरोध होता त्यातील ते एक आरोग्य विभाग जनतेशी संबंध होता. हे कसलं राजकारण? फडणवीस आधीच भ्रष्टाचार समोर आणणार असतील तर आम्ही स्वागत करू.