रोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता, आता बाळासाहेबांना कसं विसरलात?; शिंदेंच्या जाहिरातीवर राऊतांची टीका

रोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता, आता बाळासाहेबांना कसं विसरलात?; शिंदेंच्या जाहिरातीवर राऊतांची टीका

मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीनं भुवया उंचावल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुख्यमंत्री शिंदेंच्या जाहिरातीनं भुवया उंचावल्या आहेत. एकेकाळी देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा केली होती. मात्र आता गेले काही दिवस भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर ही जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. या जाहीरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती' देण्यात आली आहे तर फडणवीसांना 23.2% पसंतीचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील 49.3% जनतेनं शिंदे-फडणवीसांना पसंती दर्शवल्याचा दावा केला आहे. मतदानासाठी भाजपला 30.2%, शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजप-शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याची माहिती या जाहिरातीतून मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, ही जाहिरात सरकारी आहे का? बाळासाहेबांचा फोटो कुठे दिसत नाही. वर्षा बंगल्यापुरता हे मर्यादित आहे. रोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता, आता बाळासाहेबांना कसं विसरलात? आनंदाच्यावेळी बाळासाहेबांना कसे विसरलात. असे म्हणत राऊतांनी जोरदार टिका केली आहे.

रोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता, आता बाळासाहेबांना कसं विसरलात?; शिंदेंच्या जाहिरातीवर राऊतांची टीका
'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे', मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती'; शिंदेंच्या जाहिरातीने भुवया उंचावल्या
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com