'चंदा दो धंदा लो' राऊतांचा भाजपला खोचक टोला

'चंदा दो धंदा लो' राऊतांचा भाजपला खोचक टोला

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. चैत्यभूमीवर या यात्रेची सांगता झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. चैत्यभूमीवर या यात्रेची सांगता झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग या माध्यमातून फुंकण्यात येईल. या सभेआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत वंचितला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीचं मत काय आहे? यावर राऊतांनी भाष्य केलं आहे.

वंचितबाबत बोलताना म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा या पक्षांमध्ये सुरु आहे. आज काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. अशात वंचितसोबतच्या आघाडीवर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. आमचा त्यांच्याशी प्रस्ताव संदर्भात चर्चा सुरू आहे. आजच्या भाषेत ‘डायलॉग’ असं म्हणत आहे. संविधान संकटात असताना सर्वजण आपण समाजाने एकत्र यावे वंचितांचे देखील तीच इच्छा आहे. आम्ही चार जागा संदर्भात प्रस्ताव दिला आहे. त्याच्यावर प्रकाश आंबेडकर विचार करतील, असं राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले की, या देशाची जनता विसरणार नाही राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊ शकतात.  राहुल गांधी मणिपूरमध्ये राहिले पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप माणिपूरला जाऊ शकले नाही याचे कारण काय? तुम्ही अखंड हिंदुस्तानची भाषा करत आहे त्यात मणिपूर येत नाही का?

देशाचा पंतप्रधान म्हणजे एक अशी व्यक्ती बसली आहे त्याला गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही. त्यामुळे 2024 मध्ये कायमस्वरूपी त्यांना गुजरातमध्ये पाठवण्याचा जनतेने घेतला आहे. जी जागा मोदींचा उद्योगपती  करण्याचा प्रयत्न करत आहे तिथे राहुल गांधी यांची यात्रा संपली. जे मणिपूरला गेले नाहीत ते या वेळेला कायमचे गुजरातला जातील.

इलेक्ट्रॉन बोंड घोटाळ्यानंतर आणि सुरज चव्हाण मालमत्ता जप्ती बाबत मी बोलेल माझी पण मालमत्ता जप्त झाली आहे भारतीय जनता पक्षाच ऑफिस म्हणजे ed आहे. लॉटरी किंग तेराशे कोटी रुपये भाजपला देतो असे अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ed कारवाई केली आहे भाजपचे अध्यक्ष ने गेली पाच वर्ष ते पैसे स्वीकारले आहे पहिले गुन्हेगार नरेंद्र मोदी दुसरे अमिषा शहा तिसरे भाजपचे अध्यक्ष.

'चंदा दो धंदा लो' वॉशिंग मशीन अशा उद्योगपतींसाठी निर्माण केली आहे . आम्ही देखील शोधतोय विजय मल्ल्या, निरव मोदी ,दाऊद इब्राहिम याची नावे इलेक्ट्रॉन बॉडमध्ये आहेत की नाही

या देशात काँग्रेस नसते तर स्वातंत्र्यच मिळालं नसतं. स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेते काँग्रेसचे उतरले आणि ब्रिटिशांना त्यांनी लढा दिला काही मतभेद आपले असू शकतात त्याच्यामुळे काँग्रेस नसते तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावा लागली असती, हे सत्य त्यानी स्वीकारल पाहिजे काँग्रेस नसते तर या देशाला आधुनिक नेतृत्व भेटले नसते.

हा देश बुवा महाराज तंत्र मंत्र जादू मंत्र त्यांच्या कडे गेला आहे. राहुल गांधी इंदिरा गांधी यांनी या देशाला तुमच्या हातातला मोबाईल इंटरनेट दिल. काँग्रेस नसता तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी यांना बाप जन्मात जमलं नसतं. सर्जिकल नावाच्या खाली फटाके फोडून तिकडे पाठवायचे सीमेवरून. भारतीय जनता पार्टी यांनी कायम काँग्रेसचे ऋण मानले पाहिजे

आमश्या पाडवी यांच्याबाबत बोलताना म्हणाले की, विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावरच बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी अशा लोकांना योग्य प्रवाहात आणण्याचा काम केलं. मला त्यांच्याविषयी फार निर्णय माहिती नाही. हे सर्व लोक सोडून गेलेले हे दुर्दैव आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com