"ते सडके कांदे आहेत, सडके बटाटे आहेत, हे हिंदुत्वाचे बाप बनले आहेत का?" राऊतांची बोचरी टीका
सध्या वादाच्या भोवऱ्यात असलेले दादर रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आज दर्शनासाठी जाणार आहेत. यावरूनच उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "ते सडके कांदे आहेत, सडके बटाटे आहेत, हे हिंदुत्वाचे बाप बनले आहेत का?" अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला करत म्हणाले की, "ते सडके कांदे आहेत, सडके बटाटे आहेत, हे हिंदुत्वाचे बाप बनले आहेत का? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला? या भाजपवाल्यांना हिंदुत्व शिकवलं कोण? हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यांना बोट धरून हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं. पण या वाटेवर सुद्धा त्यांनी खड्डे केले आहेत. हे लोक काय, आम्हाला हिंदुत्व शिकवणार? आमचं हिंदुत्व मतसाठी नाही, तर ते आमचं जीवन आहे, संस्कृती आहे. तुमच्यासाठी हिंदुत्वासाठी पुनः फावडे घेऊन फिरावे लागत नाही. हिम्मत असेल, तर सावरकरांना भारतरत्न द्या."
पुढे म्हणाले, "हे मंदिर चारशे वर्षांपूर्वी आम्हाला निबंध आहे. आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होणार आहे. स्वयं आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आणि मी, तसेच कामगार नेते सावंत यांनाही या महाआरतीत सहभागी होणार आहेत. भाजपाने यावं, आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ. त्यांना काय घंटा हिंदुत्व कळतंय? त्यांनी हे मंदिर तोडून दाखवाव, आम्हाला पाहायचं आहे की भाजप खरच हिंदुत्ववादी आहे का? मंदिरावर बुलडोजर चढवणार आहेत. तुम्ही विकासासाठी मुंबईतील झाडे तोडत आहात, इमारती तोडत आहात, मंदिर तोडत आहात."
मंत्री मंडळ विस्तारावरुन म्हणाले की, "पूर्ण बहुमत मिळाल्यावरही पाशवी आणि सैतानी बहुमत, ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावरही ही माणसं मंत्रिमंडळ विस्तार करू शकत नाहीत. सरकार देऊ शकत नाहीत. राज्यांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, लुटमार सुरू आहे."