'...चिखलफेकीसाठी त्यांनी टोळ्या भाड्याने घेतल्या' चिपळूणच्या राड्यावरुन राऊतांची भाजपवर टीका

'...चिखलफेकीसाठी त्यांनी टोळ्या भाड्याने घेतल्या' चिपळूणच्या राड्यावरुन राऊतांची भाजपवर टीका

चिपळूणमध्ये काल मोठा राडा झाला. राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी होती.
Published by :
shweta walge

चिपळूणमध्ये काल मोठा राडा झाला. राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी होती. निलेश राणेंनी भास्कर जाधव यांना चॅलेंज दिलं होतं. निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा होती. ते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरुन गेले. त्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये मोठा राडा झाला. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडले आहेत. चिखलफेक करण्यासाठी भाजपने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती होती. यशवंतराव चव्हाणांपासून ते आतापर्यंत त्या संस्कृतीवर नशेच्या, दारूच्या, अनैकतेच्या गुळण्या टाकण्याचे काम भाजपने काही भाडोत्री लोकांकडून सुरु केले आहे.

आम्ही सुद्धा कठोर शब्दांचा वापर करतो. आमच्याकडून एखादा-दुसरा शब्द चुकीचाही जात असेल. मात्र ज्या पद्धतीने भाजपने जो दारूखाना सुरु केलाय. त्यावरून मला महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत आहे. त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे हजारो कोटी रुपये भाजपच्या तिजोरीत जमा आहेत. मिठा गराची जमीन अडाणींना, धारावी अडाणींना अख्खी मुंबई अडाणींना दिली आहे. मुंबईचे उद्या नाव बदलून अडाणीनगर केले तर 106 हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य दिले आहे. त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल. काय करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? हिंदुत्वरक्षक काय करताय कोल्हापुरात बसून, अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात चालली आहे. आणि त्या मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय. हे सगळे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसले आहे. सुप्रीम कोर्टाने जो काल निकाल दिलेला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणारा आहे. त्यात जे नावे जाहीर होतील ते बघाच, असेही त्यांनी म्हटले आहे.

'...चिखलफेकीसाठी त्यांनी टोळ्या भाड्याने घेतल्या' चिपळूणच्या राड्यावरुन राऊतांची भाजपवर टीका
गुहागरमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर राडा

दरम्यान, कोकणात काल (17 फेब्रुवारी) चांगलाच राजकीय शिमगा पहायला मिळाला. यावेळी ठाकरे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली. भाजपा नेते निलेश राणे यांची आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्तानं ते चिपळूणमध्ये आले. यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक झाली. या मुद्द्यावरुन आता राजकीय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com