वर्ल्ड कपवर बोलताना संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

वर्ल्ड कपवर बोलताना संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता रंगणार आहे. त्याआधी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
Published by  :
shweta walge

अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना दुपारी 2 वाजता रंगणार आहे. त्याआधी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावरच बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या देशात काहीही होऊ शकतं. कालपर्यंत हा खेळ होता. संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी होता. आता भारतीय जनता पक्ष सहभागी झाले आहे. हा खेळ राहिला नाही. हा इव्हेंट झाला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

काय म्हणाले संजय राऊत?

आपण जाऊन पाहा गेल्या काही काळापासून भाजपचे लोक संध्याकाळी सांगतील मोदी होते म्हणून आम्ही जिंकलो. मोदी होते म्हणून अशी बॉलिंग पडली, अशी गुगली पडली. मोदींनींच मंत्र दिला अमित शाहा क्रिकेटच्या मागे उभे राहून मार्गदर्शन करत होते. हे लोक खेळालाही सोडायला तयार नाहीत, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

क्रिकेटच्या इव्हेंटपासून ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी घ्या. पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. इकडचे उत्सव दिल्ली किंवा मुंबईत होत असत. कोलकाता ईडन गार्डनला होत असत. मुंबईतून संपूर्ण क्रिकेट हे अहमदाबाद हलवण्यात आलं. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे. मोदी थे इसलिये हम जीत गये, मोदी है तो वर्ल्ड कप की जीत मुनकिन है, असं हे भाजपचे लोक बोलतील. पण भारतीय संघाचाला माझ्या शुभेच्छा आहेत. आपण जरुर जिंकू, असं संजय राऊत म्हणालेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही संजय राऊतांनी भाष्य केलंय. सध्या आता मॅच फिक्सिंग आहे. म्हणून नाहीतर आत्ताच त्यांचा धुवा उडालेला आहे .बॅटिंग आणि मॅच फिक्सिंग वरती हे राज्य सुरू आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

निवडणूक आयोग ही खाजगी प्रॉपर्टी आहे. असे तपास यंत्रणा ईडी ,सीबीआय, निवडणूक आयोग ,राज्यपाल ज्यांना आपण घटनात्मक संस्था म्हणतो जे पक्षपाती असूनही स्वतंत्रपणे काम करावं, अशी आमची भूमिका ही देशाची भूमिका आहे. पण ते आता केंद्राच्या सत्ताधाऱ्यांच्या तालावरती नाचत आहे. त्यामुळे ती सध्या त्यांची ती खाजगी प्रॉपर्टी आहे. 2024 नंतर त्यांना स्वतंत्रपणे काम करावे लागेल, असंही संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणारय..विश्वचषकात भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com