Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : "...तर त्यांनी बावनकुळेंना अटक करावी" राऊतांची फडणवीसांकडे मागणी; चंद्रशेखर बावनकुळेंवर केले गंभीर आरोप
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक आज पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मोठी मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "बावनकुळे आणि त्यांची भाजपची टीम, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स भाजपबरोबर असलेले आणि नागपूरमधील काही यंत्रणा यांनी एकत्र येऊन त्यांची खाजगी वॉर रूम उघडली आहे. त्या माध्यमातून भाजपचे, शिंदे -मिंधे गटाचे लोकंही त्या सर्व्हिलन्सखाली आहेत आणि ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचे लोक आणि काँग्रेसची लोकं या सर्वांवरती व्हिजिलन्स आहे. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे. घटनाबाह्य कृत्य आहे".
"आमच्या खाजगी जीवनात घुसण्याचा हा प्रकार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आज स्पष्ट केलं आहे की, हो आम्ही फोन टॅप करतो. आता गुन्हा जर गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीसांना वाटत असेल तर त्यांनी बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करुन गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्याने विरोधी पक्षातील लोकांचे फोन टॅप करन हे कायदेशीर गुन्हा आहे".

