Sanjay Raut : अटकेआधी शिंदेंचा फोन, राऊतांचा शिंदे आणि शाहांवर गंभीर आरोप; म्हणाले...
काल संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग' (Narkatla Swarg) या पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकातून मोदी आणि शदर पवार यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान आज माध्यमांशी बोलताना ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मला फोन आला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यावेळी शिंदेनी गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का? असं म्हणाल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की,"ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. त्यावेळी ते मला म्हणाले की, मी अमित शाह यांना सांगून वरती बोलू का? त्यावर मी त्यांना नको, काही गरज नसल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर मी त्यांना असं देखील म्हणालो की, तुम्ही वरती बोलल्यानंतरही मी तुमच्या पक्षात येणार नाही", अस संजय राऊत म्हणाले आहे.
तसेच पुढे संजय राऊत म्हणाले की,"मी अमित शाह यांना रात्री 11 वाजता फोन केला होता. मी त्यांना म्हणालो, माझ्या मित्रावर रेड पडत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय? हे तुमच्या सांगण्यावरुन होतं आहे. जर मला अटक करायची आहे तर मी दिल्लीच्या घरी आहे ही नौटंकी बंद करा. यावर मला काहीच माहिती नाही, असं अमित शाह म्हणाले", असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.