Sanjay Raut: अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद कसं मिळणार? संजय राऊत यांनी प्लॅन सांगितला
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवारांच्या गटात फूट पडण्याची शक्यता वर्तावली जात आहे. भाजपकडून पवारांच्या आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे असं असताना संजय राऊत यांनी त्यांची शक्यता वर्तावली आहे, राऊतांनी अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद कसं मिळणार? असा प्रश्न करत भाजपचा प्लॅन सांगितला आहे.
महाराष्ट्राचं भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न गौतम अदानी करत आहे- संजय राऊत
याचपार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचं भवितव्य ठरवण्याचा प्रयत्न गौतम अदानी करत आहे. ज्यांनी महाराष्ट्राच विमानतळ ताब्यात घेतल, ज्यांनी धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली. ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले, असे गौतम अदानी महाराष्ट्रचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.
हे गौतम अदानी म्हणजे आचार्य विनोबा भावे आहेत का? हे गौतम अदानी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत. कोण आहे हा? एक उद्योगपती, मोदींचा एक मित्र आहे आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यस्थी करतोय आणि हा ठरवणार महाराष्ट्रचं भवितव्य जे त्याच्या घरी जातात त्यांना लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
शरद पवारांचे 5 खासदार फोडा आणि मंत्रिपद मिळवा अशी भाजपची प्लॅनींग- संजय राऊत
अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद यासाठी नाही कारण, मंत्रिपदाचा केंद्राने जो फॉर्मुला ठरला तो काही तरी 6 खासदारांमागे एक तर मला अशी माहिती मिळाली आहे की, प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितल तुम्ही शरद पवारांचे 5 खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा 6 चा कोटा पुर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ.
शरद पवार यांनी त्यांच्या जिवाचं रान करून खासदार आणि आमदार मिळवले आणि हे त्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी जे फुटणारे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. मी जर हे असं पक्ष फोडण्याचं काम केल असत तर माझी हिम्मत झाली नसती बाळासाहेबांच्या नजरेला नजर मिळवण्याची. जे कोणी आमदार खासदार हे शरद पवारांसोबत गद्दारी करण्याचा प्रयत्न करत असतील ते महाराष्ट्रासोबत पण गद्दारी करत आहेत.