पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे.

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं आहे.

राऊतांनी या पत्राची सुरुवात मा.गृहमंत्री महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? असा सवाल विचारत केली आहे. आधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणेचा वापर होत असे पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्यात हे चिंताजनक आहे. संबंधित खुनाची न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच वारीशे कुटुंबीयांना 50 लाखांच अर्थसहाय्य सरकारने करावे अशी संजय राऊत यांनी मागणी केली आहे.

तसेच कोकणात 4 फेब्रुवारी 2023 रोजी आंगणेवाडीजत्रेत भाजपाच्या जाहीर सभा झाली त्या सभेत ठासून सांगितले की नानार येथे रिफायनरी होणारच...कोण अडवतय ते पाहू... व आपल्या वक्तव्यस चोवीस तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीशे यांची हत्या झाली...हा फक्त योगायोग समजावा का काही? असा सवाल संजय राऊत यांचा फडणवीस यांना विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com