Sanjay Raut: मुंबई मनपा स्वबळावर? शिवसेना ठाकरे गटाचा प्लॅन काय? संजय राऊत थेट बोलले

Sanjay Raut: मुंबई मनपा स्वबळावर? शिवसेना ठाकरे गटाचा प्लॅन काय? संजय राऊत थेट बोलले

संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार का आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्लॅन काय आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची मागणी आणि पक्षप्रमुखांसोबत चर्चा होणार.
Published by :
Team Lokshahi
Published on

विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि नवे सरकार देखील स्थापन झालं आहे. त्यामुळे आता सर्व पक्षांच लक्ष हे महानगरपालिकांच्या निवडणुकांवर आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार का? आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्लॅन काय आहे याबद्दल संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. विधानसभांचे अधिवेशन देखील झाले आहेत ईव्हीएमने निकाल लावले आहेत. आता पक्ष बांधणी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत बैठका, आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असं त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच्यामुळे ते आता या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतील त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड असेल किंवा पुणे असेल, कार्यकर्त्यांच मनोगत जाणून घ्याव.

यासाठी आज दिवसभर आमच्या बेठका आहेत. विधआनसभेचा जो निकाल आहे, त्या निकालावर चिंतन आणि मंथन करण्यापेक्षा आता पुढे जायला पाहिजे.... वर्षानुवर्ष आम्ही निवडणुका लढतो आहोत.... पण अशा प्रकारच्या निवडणुका इतक्या वर्षामध्ये आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता महानगरपालिकेमध्ये आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, कारण आता आपण पाहतोय मराठी माणसांवर कशाप्रकारे हल्ले होत आहेत.

मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका या स्वबळावर लढल्या जाव्या, अशी मागणी ही कार्यकर्त्यांची असते. आम्ही महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावरं लढत आलो आहोत.. कार्यकर्त्यांचा जो डेटा असतो तो स्वबळावर आहे. पण आता आम्ही आघाडीसोबत आहोत, त्यामुळे मुंबई महानगरपालिकांमध्ये पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत.... तर महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात आम्ही एकत्र बसू आणि चर्चा करणार आहोत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com