वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता? संजय राऊत यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता? संजय राऊत यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना रंगल्या होत्या. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून मी राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मविआला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. अजित दादा मविआचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याविषयीच्या अफवांवर आज पूर्णविराम मिळालेला आहे. सत्तेतील लोकं महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मविआला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

यावर तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षांबद्दल सांगा. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत, असे अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी मविआचा चौैकीदार, मी भूमिका मांडणार. माझ्यावर खापर का फोडता? सेना फुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. अजित पवारांमुळे भाजपा बॅकफूटवर गेली. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव आम्ही उघडा पाडला. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com