गद्दारांवर थुंकणं हा हिंदू संस्कृतीचा भाग - संजय राऊत

गद्दारांवर थुंकणं हा हिंदू संस्कृतीचा भाग - संजय राऊत

संजय राऊत हे सतत त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिक: Sanjay raut on Ajit Pawar : संजय राऊत हे सतत त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात. नुकतेच संजय राऊत हे त्यांच्या कृतीमुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच राऊत थुंकल्याने ते आता चर्चेचा विषय बनले आहेत.

यासर्व प्रकारावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. मी कुठे थुंकलो मला दाखवा. माझ्या दाताचा त्रास होता म्हणून ती कृती झाली.

तसेच बेईमानांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदूत्व याचा एक भाग आहे. संताप व्यक्त करणं आहे. पण मी कोणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनी देखील आपला संताप हा बेईमानांवर, देशाच्या गद्दारांवर न्यायालयात थुंकून व्यक्त केला होता. गद्दारांवर थुंकणं हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com