अंबादास दानवे नाराज? संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

अंबादास दानवे नाराज? संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे अजिबात नाराज नाही आहेत. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. काल संध्याकाळी संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली. उमेदवारीबाबत एकमत झाले. त्यात अंबादास दानवेसुद्धा होते.

अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची. त्यांनी इच्छा व्यक्त केली. एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करु शकतात. चंद्रकांत खैरे यांनी इच्छा व्यक्त केली. अजून दोन उमेदवार आहेत. या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील. त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे. पक्षासाठी काम करतो आम्ही. व्यक्तीसाठी कुणीच काम करत नाही. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com