दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. ज्याप्रकारे निवडणुकी रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून, वसुलीच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून गोळा केलेत. भारतीय जनता पार्टी स्वत:ला हिंदुत्वावादी समजते. भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक करा. मद्य धोरण घोटाळ्यातील ठेकेदारांनी भाजपाला निधी दिला आहे. हेमंत सोरेनला आपण अटक केली.

केजरीवाल यांना अटक केली. आपण मंत्र्यांना अटक करता. सगळ्यात भ्रष्ट सरकार देशात आणि महाराष्ट्रात तुमचं आहे आणि ज्यांना अटक केली पाहिजे त्यांना तुम्ही मंत्री करता, उपमुख्यमंत्री करता. याला हुकूमशाही म्हणतात. त्याच हुकूमशाहीविरुद्ध आम्ही लढतो आहे. उद्या ते कोणालाही अटक करु शकतात. मोदींना, अमित शाहांना ज्यांच्यापासून भिती वाटते की आम्हाला हरवू शकतील. त्या सगळ्यांना हे अटक करु शकतात. सरकारला भिती वाटते आहे. निवडणूक हरण्याची. लोकांचा उठाव होण्याची. त्याच्यामुळे हे सगळं नेते तुरुंगात टाकू इच्छितात.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; रोहित पवार म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com