Sanjay Raut : भारतीय जनता पक्ष हा कधीच मोठा पक्ष नव्हता

Sanjay Raut : भारतीय जनता पक्ष हा कधीच मोठा पक्ष नव्हता

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीचा रंग उधळला जाईल. अरविंद केजरीवाल यांना अटक करताच दिल्लीसह देशामध्ये लोक रस्त्यावरती उतरलं आहेत. सरकार जरी डोळं मिटून बसले असले तरी सरकारला माहित आहे देशात काय चालू आहे.

जगातल्या ज्या भागात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तेथे लोक रस्त्यावर आले. अरविंद केजरीवाल आता जास्त मजबूत झालेत. अरविंद केजरीवालांना पंतप्रधान मोदी घाबरतात. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष नाही. भारतीय जनता पक्ष हा कधीच मोठा पक्ष नव्हता.

एखादा दरोडेखोर चोऱ्यामाऱ्या करुन आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे. तसे भारतीय जनता पक्षाचं आहे. दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली श्रीमंती वाढवायची याला मी श्रीमंत किंवा धनिक म्हणत नाही. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com