ताज्या बातम्या
Sanjay Raut On BJP : टीका करत निवडणुकीवरून राऊतांनी सगळंच काढलं
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यात संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे. यात संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासावर भाष्य केलं. देशातील तपास यंत्रणांवर भाष्य केलं आहे.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरही संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना म्हणजे अग्निकुंड, शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणं, असं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. ईडी ही एक दहशतवादी संघटना आहे, असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे.