दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू - संजय राऊत

दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू - संजय राऊत

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसले तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर अनेक आरोप करण्यात आले. अनेक प्रतिक्रिया आल्या. राजकीय वर्तुळातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली.

जनता आपल्याला निवडून देते. त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत. लोकोपयोगी कामं व्हावीत, हाच माझा ध्यास आहे. “एकदा शब्द दिला की मी मागे फिरत नाही. तो शब्द पाळलाच जावा असा माझा अट्टहास असतो. म्हणून मी मुख्यमंत्री झालो. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाल की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आले. त्यामुळे त्याचं सरकार पाडण्यात आलं. असे राऊत म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना कोणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव नाही, हे दुर्देवं आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com