पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही - संजय राऊत

पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही - संजय राऊत

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

यावरुन आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ही शिवसेना आहे. त्यांनी कितीही पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही. तो धनुष्यबाण त्याच्या छाताडावरच पडणार आहे. एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे. तो पक्ष घटनेनुसारच चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार-खासदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले. अशावेळी तो पक्ष त्यांचा कसा होऊ शकेल? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ लोकशाहीत आज आली आहे. असे राऊत म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का? पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com