दादा भुसेंकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक - संजय राऊत
Admin

दादा भुसेंकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक - संजय राऊत

सत्ताधारी आणि विरोधक नेहमी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सत्ताधारी आणि विरोध नेहमी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. दादा भुसे यांनी गिरणा बचाओ समितीच्या माध्यमातून गिरणी शुगर अॅण्ड एलाइड इंडस्ट्रीज लि.ची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा केले.

कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ ४७ मुख्य शेअरधारकांची नोंद आहे. यांच्याकडून १६ कोटी २१ लाख, ८ हजार ८०० रुपये शेअर्सची रक्कम एकत्र केली आहे. परंतु तरीही दादा भुसे गिरणी सहकारी चिनी मिलला वाचवू शकले नाही. उलट शेतकरी आणि शेअर्सधारकांची फसवणूक केली. असे म्हणत त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी ट्विट केले आहे की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.असे राऊतांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com