पवारांच्या सहमतीने पहाटेचा शपथविधी झाला असता तर सरकार कोसळलं नसते - संजय राऊत

पवारांच्या सहमतीने पहाटेचा शपथविधी झाला असता तर सरकार कोसळलं नसते - संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एकच राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आम्ही विद्यमान विरोधी पक्षनेता अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारची स्थापना केली होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी स्वत:वर उपचार करुन घ्यावे. ते जगातील दहावं आश्चर्य आहेत. फडणवीसांना अटकेची भीती का वाटत होती. अशी कोणती चूक त्यांनी केली होती. पवारांच्या सहमतीने पहाटेचा शपथविधी झाला असता तर सरकार कोसळलं नसते. विधान परिषदेच्या पराभवानंतर वैफल्यातून फडणवीस असे वक्तव्य करत आहेत. असे राऊत म्हणाले.

यासोबतच त्यांनी म्हटले की, फडणवीसांच्या मांडीवर शिंदे गटाची टेस्टुब बेबी असे म्हणत राऊतांनी फडणवीस आणि शिंदे गटावर घणाघात केला आहे. फडणवीसांकडून आमचा विश्वासघात झाला आहे. सूडबुद्धीने राजकारण करण्याची भाजपाची विकृती. असे म्हणत राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com