दुरावा मिटणार? संजय राऊत यांनी केलं चक्क देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक; नेमकं कारण काय वाचाच

दुरावा मिटणार? संजय राऊत यांनी केलं चक्क देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक; नेमकं कारण काय वाचाच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपुरात कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपुरात कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आलं आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, राज्यात आरोग्य विषयक चांगली संस्था उभी राहते याचं कौतुक केलं पाहिजे. या देशात अशा संस्थेची गरज आहे. फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या वडिलांचं निधन कॅन्सरने झालं होतं. त्या वेदनेतून त्यांनी रुग्णालयाचं काम हाती घेतलं असेल. असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपुरात उभं राहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे हे रुग्णालय उभं राहिलं आहे. त्याबद्दल त्याचं कौतुक आहे. असे राऊत म्हणाले. त्यांच्या या कौतुकामुळे दुरावा कमी झाला का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com