Sanjay RautTeam Lokshah
बातम्या
केंद्राकडून फडणवीस यांच्यावर गद्दारांची कार चालवण्याची जबाबदारी, मला त्यांची कीव येते -संजय राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, पूर्वी ते आमच्यासोबत असताना उत्तम विरोधी पक्षनेते होते. मुख्यमंत्रीही दिल्लीत हेलपाटे मारत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या काय जबाबदारी आहेत माहीत नाही.
मला त्यांची दया येते. कीव येते. त्यांना देवाने लवकरच या संकटातून सोडवावे ही प्रार्थना करतो. काल पाहिलं ते फुटलेल्या गटाची गाडी चालवत होते, त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, हे पाहावं लागेल. असे म्हणत राऊय यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.