Sanjay RautTeam Lokshah
ताज्या बातम्या
हे पक्ष नव्हे तर पिसं गेलेले कावळे - संजय राऊत
काँग्रेसच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवरून सगळीकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे.
काँग्रेसच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवरून सगळीकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. यातच आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मालेगावात झालेल्या विराट सभेने आमचा पक्ष काय आहे, हे दाखवून दिलंय. वीर सावरकरांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. या विषयावर मी लवकरच राहुल गांधी यांची भेट घेणार आहे. असे राऊत म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, सावरकरांनी ज्या प्रकारे त्यांनी देशासाठी शिक्षा भोगली आहे. जेलमध्ये जाऊन आलो आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सुनावले जात आहेत. ती मॅच फिक्सिंग आहे. हे पक्ष नव्हे तर पिसं गेलेले कावळे आहेत. आमचा पक्ष आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. असे राऊत म्हणाले.