Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा ?

खासदार संजय राऊत यांनी सांगलीतून माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार संजय राऊत यांनी सांगलीतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, सगळ्यात अत्यंत महत्वाचा विषय या निवडणुकीतला काल समोर आला आहे. तो अत्यंत गंभीर आहे. भारताचा निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा आणि आम्ही जे म्हणतोय या देशाचा निवडणूक आयोग हा मोदी - शाहांच्या पकडीमध्ये गुदमरला आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांत जे आकडे त्यांनी आता दिलेलं आहेत आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी. हे साधारण त्या सर्व मतदारसंघामध्ये 6 ते 60 टक्के मतदानात वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आले आहे. नांदेडला मतदान झालं तेव्हा 52 टक्के मतदान झालं होते. हे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत. पण 52 टक्क्याचे 62 टक्के कसं काय होऊ शकते. अशा प्रकारचे आकडे काल निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत.

यासोबतच राऊत पुढे म्हणाले की, 11 दिवस लागतात तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी. हे डिजीटल इंडिया आहे. संध्याकाळी किती टक्के मतदान झालं हे आम्हाला समजत होते. फक्त नागपूर मतदारसंघामध्ये साधारण अर्धा टक्के मतदान त्यांनी कमी दाखवलं आहे. हा एक वेगळा घोळ आहे. नागपूर सोडून सगळीकडे 60 टक्के मतदान वाढलं आहे. हे वाढलेलं मतदान कुठं गेले?, कुणी केलं, 11 दिवस का लागले? हा निवडणूक आयोगा संदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी, शाह या कारस्थानी राजकारण्यांचा हातातला एक बाहुलं झालंय का?

तसेच ते म्हणाले की, मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला. अशा प्रकारची विश्लेषण आल्यावर तब्बल 11 दिवसांनी त्या सर्व मतदारसंघामध्ये नवीन आकडे समोर आले. मतप्रत्रिकेवर आम्ही जेव्हा मतदान करत होतो. तेव्हाही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हे सांगितले जात होते आणि ते आकडे परफेक्ट असायचं. या वेळेला मोदींनी डिजीटल इंडिया करुनसुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करुनसुद्धा त्या त्या दिवशी संध्याकाळी आलेलं आकडे आणि नंतर 11 दिवसांनी आलेलं आकडे. 11 दिवसांनी कधीही आकडे जाहीर होत नाही किती टक्के मतदान झालं ते. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com