Admin
बातम्या
काल आम्ही शोधत होतो जळगावात उंदीर घुसलाय काय? संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल
जळगावमधील पाचोऱ्यात उद्या (23 एप्रिल) ठाकरे गटाची सभा होणार आहे.
जळगावमधील पाचोऱ्यात उद्या (23 एप्रिल) ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाही तर सभेत घुसणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. यावरुन अनेक प्रतिक्रिया आल्या.
आता माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, जळगाव आमचा आहे. शिवसेनेचा आहे. जळगावात आम्ही घुसलो आहे. काल आम्ही शोधत होतो. कोणतो उंदीर घूसलाय का? गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गँग असे राऊत म्हणाले.