Sanjay Raut : आपण सर्व एकत्र आहोत मग आपण सांगली लढूया

Sanjay Raut : आपण सर्व एकत्र आहोत मग आपण सांगली लढूया

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशातील मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. आणि प्रादेशिक पक्ष देशभरातले आहेत. आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत शिवसेना असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारखं पक्ष आहेत. हे राज्याच्या अस्मितेशी जोडलेले पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त मागतात.

आमच्यामध्ये तसे मतभेद नाही आहेत. एखाद दुसरी सीट, एखाददुसरी जागा त्यावर कार्यकर्ते दावे करतात. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा दबाव असतो. आता भिवंडी, भिवंडी गेले अनेक वर्ष भाजपाकडे आहेत. जर आम्ही सर्व एकत्र आलो तर तर भिवंडीची सीट भाजपाकडून आम्ही काढून घेऊ. कोल्हापूरची जागा आम्ही हसतहसत सोडली. आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना यावेळेस लोकसभेत जाणार नाही.

मग आमचे कार्यकर्ते असे म्हणतात सांगली लढूया. शेवटी आपण सर्व एकत्र आहोत. मग आपण सांगली लढूया. आता या विषयावरची चर्चा होऊन मार्ग निघेल. आज सकाळीचं माझं शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com