...तर भ्रष्टाचाराची प्रकरणे पटापटा बाहेर पडतील; संजय राऊत

...तर भ्रष्टाचाराची प्रकरणे पटापटा बाहेर पडतील; संजय राऊत

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, सिसोदियांवर ज्याप्रकारची कारवाई झाली आहे. त्यानुसार केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे सरकार नाही. जिथे सरकारला प्रश्न विचारला जात आहे. तिथे ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग केला जात आहे. देशाला दरदिवशी लुटलं जात आहे. रोज शंभर प्रकरणं येतील तुमचे. मंत्रालयाबाहेरचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची शंभर प्रकरणं पटापटा पडतील. असा राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

मनीष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी जगाला हेवा वाटावा असं काम केलंय. अबकारी धोरणाबाबत त्यांना अटक केली. असे निर्णय कॅबिनेटचे असतात.राजकीय लोकांना विविध प्रकरणात गुंतवलं जात आहे. जे प्रश्न विचारत आहेत. त्यांना अटक केली जात आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com