बातम्या
बारसूत येऊ देणार नाही ही धमकी देणाऱ्याला अटक करा - संजय राऊत
कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत.
कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. नारायण राणे यांनी हिंमत असेल तर बारसूत येऊन दाखवा, येऊच देणार नाही असे म्हटले होते. यावरुन आता संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे बारसूतील लोकांना भेटतील. चर्चा करतील. बारसूत येऊच देणार नाही म्हणजे काय? अशा धमक्या देणाऱ्यांना लगेच अटक केली पाहिजे. येऊ देणार नाही या पोकळ धमक्या बंद करा. असे संजय राऊत म्हणाले.