मोदी आणि शाहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही - संजय राऊत

मोदी आणि शाहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही - संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी विरोधांवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार संजय राऊत यांनी विरोधांवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाच्या वतीने वामनराव पावडे मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची निवडही बेकायदा आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. भाजपच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले. मात्र, ते स्वतः वकील आहेत.

तसेच मोदी आणि शहाच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. . शिवसेना कोणाची हा निर्णय जनता घेईल. येत्या सष्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com