पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली; ती गदा त्यांच्यात डोक्यात बसली - संजय राऊत

पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली; ती गदा त्यांच्यात डोक्यात बसली - संजय राऊत

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला.
Published by :
Siddhi Naringrekar

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात संघाचे लोकही आहेत. हिंदुत्व ही आमची राजकीय रोजीरोटी नाही. हिंदुत्व ही आमची श्रद्धा, संस्कार आणि संस्कृती आहे. ज्यांचे ते नाही ते अशा दंगली घडवत आहेत. असे राऊत म्हणाले.

तसेच ते म्हणाले की, पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा तुमच्याच डोक्यात बसली. हनुमान चालीसा करून वातावरण बिघडवता हे तुमचे धंदे आहेत. राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com