बातम्या
हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे - संजय राऊत
विधीमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलं.
विधीमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात केलं. संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, विधीमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही. राज्याच्या सर्वच भागात शिवसेनेचे नेते, उपनेते, प्रमुख अधिकारी संपर्क करत आहेत. मूळ पक्ष आमच्यासोबत आहे. असे राऊत म्हणाले.
यासोबतच राऊत पुढे म्हणाले की, ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. आम्ही लफंगे नाहीत. पदे गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं संसदीय गटनेते पद काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.