Sanjay Raut : वंचित बहुजन आघाडीच्या समोर 4 जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे

Sanjay Raut : वंचित बहुजन आघाडीच्या समोर 4 जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी संजय राऊत म्हणाले की, आम्हाला भाजपाला पाडायचं आहे. आम्हाला हुकूमशाहीला पाडायचं आहे. हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहित आहे. आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एका दुसऱ्या जागेवरुन काही चर्चा होत आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही एका दुसऱ्या जागेवरुन चर्चा काही बाकी आहे. त्या होता आहेत. त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत.

उद्या जर आम्हाला वाटलं की प्रकाश आंबेडकर आणि आमच्यामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे तर आम्ही व्यक्तीगतरित्या स्वतंत्रपणे करु. वंचित बहुजन आघाडीच्या समोर 4 जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे. त्यांनी जी आम्हाला यादी दिली होती 27 जागांची त्यातल्या 4 जागा आहेत.

त्या 4 जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचे आहे की, या 4 जागांसंदर्भात तुमची भूमिका काय आहे. याच्यामध्ये बोलवण्याचा, न बोलवण्याचा , मानसन्मानाचा काही प्रश्नच येत नाही. आम्ही कुणाला निमंत्रण देऊन बोलवत नाही. महाविकास आघाडी हे एक कुटुंब आहे. प्रत्येकाने कधीही येऊन आमच्या बैठकीत किंवा चर्चेत सामील होऊ शकता. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com