Sanjay RautTeam Lokshahi
ताज्या बातम्या
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे'; शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी; संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले...
आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे.
आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर "महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे" असे लिहिण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. या देशात लोकशाही आहे. या देशात सामान्य नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. असे राऊत म्हणाले.