शिवसेना ही काय निवडणुक आयोगाच्या बापाची नाही, त्यांनी उचलावी आणि...; संजय राऊत

शिवसेना ही काय निवडणुक आयोगाच्या बापाची नाही, त्यांनी उचलावी आणि...; संजय राऊत

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि पक्ष गेल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. आमचा पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. माझ्या वडिलांचं नावही चोरलं. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांचं नाव घेऊन निवडणुकीला सामोरे जा. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरल्याशिवाय आता मोदींनाही मते मिळत नाहीत. असे उद्धव ठाकरेंनी शिवसेनासह भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली.

त्यानंतर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, शिवसेना ही काय निवडणुक आयोगाच्या बापाची नाही. त्यांनी उचलावी आणि दुसऱ्या कुणाला द्यावी. ही जनतेची आहे. हे सगळं खोक्याचं राजकारण आहे. कोकण आणि शिवसेनेचं अतुट नातं आहे. खोक्याने जनता विकत घेतली नव्हती. कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com