बातम्या
संदीप देशपांडे कोण? राहतात कुठे? - संजय राऊत
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञाताने हा हल्ला केला आहे. शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करताना हल्ला करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कोण आहेत ते ? कुठे राहतात ते ? कोणत्याही नागरिकांवर अशा प्रकारचे हल्ले होणं हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही. सामान्य माणूस असो वा इतर कोणीही सर्वांची सुरक्षा महत्त्वाची आहे. असे राऊत म्हणाले.