राज्यात सध्या 'मुका घ्या मुका' सिनेमा सुरु - संजय राऊत
Admin

राज्यात सध्या 'मुका घ्या मुका' सिनेमा सुरु - संजय राऊत

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Published on

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणाही विधीमंडळात केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो व्हिडीओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे सगळ्यांना, त्याला अटक केली का?" "तुम्ही मुके घ्या नाहीतर मिठ्या मारा पण तुम्ही आमच्या लोकांना अटक का करताय? शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शिवसैनिकांना अटक करणं हा पोलीस यंत्रणेचा सत्तेचा गैरवापर आहे. असे राऊत म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com