बातम्या
आधी बाप पळवत होते आता मुलही पळवायला लागलेत - संजय राऊत
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे.
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु असताना उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटामध्ये एकच खळबळ माजली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले. भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते. असे राऊत यांनी म्हटले आहे.