Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा - संजय राऊत

विरोधक सत्ताधारी एकमेकांवर टीका करत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विरोधक सत्ताधारी एकमेकांवर टीका करत असतात. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, संसद भवनाच्या उद्घाटनाला 25 पक्षांचा पाठिंबा आणि 21 पक्षाचा विरोध आहे. मी शिंदे - मिंधे यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहतच नाही. मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात पाळलेले. ते कधीही कोंबड्या कापल्या जातात.

सकाळ संध्याकाळ कोंबड्या आरवतच असतात. तसे ते करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? निवडणूक आयोगाने एक नियम विकत दिला म्हणून पक्ष होत नाही. त्या टोळीने 48 जागा लढव्यावा आम्हाला काही फरक पडत नाही. आमचा 19 खासदारांचा आकडा लोकसभेत कायम राहील. ह्या लोकांना 22 काय 5 जागा मिळाल्या तरी भरपूर आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com