Sanjay Raut : वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता

Sanjay Raut : वंचितनं 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसतं आहे.

तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता. तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. या हुकूशाहीविरुद्धच्या लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकर यांचे आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं.

पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल तर ती दूर करण्यात आम्हाला यश येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com