Sanjay Raut : विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही नक्की आदर करु

Sanjay Raut : विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही नक्की आदर करु

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, विश्वजीत कदम असतील, विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. काँग्रेस पक्षाचे ते जुने, जाणते कार्यकर्ते आहेत. सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचे काम करत आहेत. तरीही गेल्या काहीवर्षापासून सांगलीमध्ये काही जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो. मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो. दंगली घडवल्या जातात. हे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनाही माहित आहे. गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. हेसुद्धा विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना माहित असायला हवं. त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचा आहे. ही जनभावना आहे.

आज परिस्थिती वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल तर तिथे शिवसेना हवी. म्हणून डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनेसुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या भावनांचा आम्ही नक्की आदर करु. भविष्यामध्ये आम्ही काय करता येईल ते पाहू. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com