संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार; राजा ठाकूर यांच्या पत्नीकडून मानहानीची तक्रार दाखल
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
यातच आता राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी थेट कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राजा ठाकूर यांच्या पत्नी म्हणाल्या की,संजय राऊत यांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केलं आहे. त्याविरोधात मी पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. मी राऊतांविरोधात मानहानीचा दावा करण्यासाठी आले आहे. असे एका माध्यमाशी बोलताना त्या म्हणाल्या.
यासोबतच त्यांनी सांगितले की, मी खूपवेळा शिवसेनेकडून लढले आहे. मी अजूनही शिवसेनेत आहे. माझे पती आता त्यांना गुंड दिसतात. असे राजा ठाकूर यांच्या पत्नी म्हणाल्या.
काय केले होते संजय राऊत यांनी आरोप?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. माझी खात्रीची माहिती आहे. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.