एक वेळ अशी आली...; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Admin

एक वेळ अशी आली...; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक राजकीय गौप्यस्फोट केले गेले आहे. यावेळी भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. 

यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवारांकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असे शरद पवार म्हणाले. आता राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष कोण ? पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी नेमकं कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केलं.

याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला.शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत. असे राऊत म्हणाले आहेत.

एक वेळ अशी आली...; शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sharad Pawar : शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com