Sanjay Raut : 'दिल्लीत भाजप पैसे वाटत होतं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं'

Sanjay Raut : 'दिल्लीत भाजप पैसे वाटत होतं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं'

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आघाडीवर दिसत असून भाजपाने दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे. कलांनुसार भाजपला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. दिल्लीत काँग्रेस पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमची कालच राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेलं आहे. महाराष्ट्रात त्यांना त्या पॅर्टनचे यश मिळाले. प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 15 ते 20 हजार मत वाढवण्यात आली. ही 39 लाख मत आली कुठून आणि जाणार कुठे ? असं मला विचारण्यात आले. त्यातली काही मत बोगस मतदार ही दिल्लीमध्ये वळवली आणि त्यानंतर 39 लाख मत तशीच्या तशी बिहार निवडणुकीत जातील. फॉर्मुला ठरलेला आहे.

केजरीवाल यांनी 10 वर्ष उत्तम काम केलं. पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे राजकारण व्यक्तीगत पातळीवर नेतात. कारण ते व्यापारी आहेत. दिल्ली लहान राज्य आहे. पैसे शेवटच्या मिनिटांपर्यंत वाटत होते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं दिल्लीत होतो मी त्यादिवशी. टेबल टाकून पैशाचे वाटप सुरु होते. पोलिसांना सूचना होत्या तक्रार घ्यायच्या नाहीत. अशाप्रकारची निवडणूक देशामध्ये कधी लढली गेली नव्हती.

हार जीत होते, संघर्ष होतो, राजकारण लढाई होते पण अशा पद्धतीने कोणीही या देशात निवडणूका लढलं नव्हते. अशा पद्धतीने महाराष्ट्रात लढले, दिल्लीत लढले आणि याच पद्धतीने बिहारला लढले जाईल म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही. काँग्रेस आणि आप एकत्र राहिले असते तर बरे झाले असते. काँग्रेस आणि आपचा शत्रू भाजप आहे. काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर पहिल्या तासातच जिंकले असते. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com