Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

Sanjay Raut : फडणवीस लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करु शकत नाहीत

खासदार संजय राऊत यांनी सांगलीतून माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार संजय राऊत यांनी सांगलीतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, फडणवीस काही गौप्यस्फोट करत नाहीत. फडणवीसांकडे काही गोपनीय अशी माहिती नाही. स्फोट करावं अशी कोणतीही गोष्ट नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेलं नाहीत. फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करु शकत नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोटे आरोप या पलिकडे ते काहीही करु शकत नाहीत. एकवेळ गृहीत धरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील त्यात गौप्यस्फोट कसला आहे. तुम्ही मुख्यमंत्री व्हा हा गौप्यस्फोट आहे? मोदी आणि शाहांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तिथे आम्ही कोण देणार?

महाराष्ट्राची जमीन त्यांच्या पायखालून सरकते आहे पूर्णपणे. ते लोकसभा हरतायत, ते राजकारण हरतायत या राज्याचे, उद्या ते विधानसभा हरणार आहेत. ज्या प्रकारचे राजकारण फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरु केलं. ती तलवार त्यांच्यावरच उलटते आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com